Breaking News

कर्जत-माथेरान मिनीबस सुरू करावी

भाजपची मागणी, एसटी आगारप्रमुखांना निवेदन

माथेरान : प्रतिनिधी

कर्जत-माथेरान मिनी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाजप माथेरान मंडलातर्फे कर्जत एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्जत-माथेरान मिनी बससेवा बंद आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानचे माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, संदीप कदम, राकेश चौधरी व  लक्ष्मण शिंगाडे यांनी सोमवारी कर्जत एसटी आगारप्रमुख यादव यांची भेट घेतली व कर्जत-माथेरान मिनी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली.

कर्मचार्‍यांच्या संपाबाबत येत्या काही दिवसांतच निर्णय होण्याची शक्यता आहे. संप मिटल्यानंतर मिनी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आगारप्रमुख यादव यांनी या वेळी दिले.

Check Also

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या …

Leave a Reply