Breaking News

पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत -मुख्याधिकारी पंकज भुसे

मुरूड नगर परिषदेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मुरूड : प्रतिनिधी

आपल्या लेखणीच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी पत्रकार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचा समाजाच्या सर्व स्थरांकडून उचित सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा मुरुड नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

पत्रकार दिनानिमित्ताने मुरूड नगर परिषदेने येथील पत्रकारांचा गुरुवारी सत्कार केला. नगर परिषदेच्या  कै.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्याधिकारी भुसे बोलत होते. पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र नांदगावकर यांनी केले. येथील पत्रकार आपल्या लेखनातून मुरूडचं नावलौकिक वाढवित आहेत. त्यांचे योगदान कधीही न विसरले जाणारे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संजय करडे, सिराज शेख, सुधीर नाझरे, नितिन शेडगे, गणेश चोडणेकर, प्रकाश सद्रे यांना  मुख्याधिकारी भुसे व प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या  हस्ते गुलाबपुष्प, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय करडे यांनी सत्काराला उत्तर दिले. प्रशांत दिवेकर, नंदकुमार आंबेतकर, संजय वेटोळी, नगर परिषदेचे लेखापाल कपिल वेहेले, मनोज पुलेकर, साहिल मुजावर, सतेज निमकर, सुदेश माळी  व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply