Breaking News

राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा जिल्हा मेळावा उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही  राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित, शिक्षकहित जपणारी संघटना असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी माणगाव येथे केले.

संघटनेचा जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी माणगाव येथील कुणबी भवन येथे राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करीत होते. रायगड जिल्ह्यातील डिजिटल शाळांना सौरऊर्जा पुरवावी, अशी मागणी  जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संजय निजापकर यांनी प्रास्ताविक केले. आई कनकाई सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील कदम यांनी मनोगत व्यक्त केले.  संगीता अनिल नाचपल्ले यांच्या ‘प्रेरणादायी भाषणे‘ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. राजाराम शेलार (पोलादपूर), अंजली चांदोरकर (महाड), दत्तात्रय शिनगारे (माणगाव), गणेश अकोलकर (म्हसळा), प्रशांत वाणी (श्रीवर्धन), संजय पालवे (तळा), सुभाष जाधव (रोहा), राजेंद्र साळावकर (मुरूड), रंजिता पिंगळे (अलिबाग), सतिष खाणेकर (सुधागड), रामकृष्ण भोईर (पेण), राजाराम जाधव (खालापूर), शशिकांत पालकर (कर्जत), प्रेमा कारंडे (पनवेल), श्रीकांत माने (उरण) आदी शिक्षकांचा या मेळाच्यात आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मेळाव्याचे सूत्रसंचालन अनिल नाचपल्ले यांनी केले. माणगावच्या गटशिक्षणाधिकारी सुनीता खरात, सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे, संघटनेचे राज्य कार्यालयीन प्रमुख भगवान घरत, कोकण विभाग अध्यक्ष बबन फर्डे, भास्कर थोरवे, रविकिरण पालवे, उमेश महाडेश्वर, पूजा शहा, शंकर शिंदे आदींसह संघटनेचे जिल्ह्यातील सदस्य या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या रायगड शाखा व माणगाव तालुक्याच्या पदाधिकारी व सदस्यांनी हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. गणेश निजापकर यांनी आभार मानले.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply