Breaking News

हागणदारीमुक्त अभियानासाठी कर्जत नगर परिषद प्रयत्नशील

पब्लिक टॉयलेटमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

कर्जत : बातमीदार

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरा मुक्त शहर बरोबर हागणदारी मुक्त शहराच्या नामांकनमध्ये तिसरे स्थान मिळविण्यासाठी कर्जत नगरपालिका सज्ज झाली आहे.त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसविण्याचे काम सुरू आहे.

‘क‘ वर्ग नगरपालिका असलेल्या कर्जत शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मात्र तरीदेखील कर्जत नगरपालिका हद्दीत यापूर्वीच हागणदारी मुक्त अभियान यशस्वी झाले आहे. शहरात एकूण 6820 कुटुंबे असून त्यातील केवळ पाच टक्के लोकांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. नगरपालिकेने वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील विविध भागात नऊ ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट उभारले आहेत. वैयक्तिक शौचालय बांधू न शकणार्‍या नागरिकांसाठी स्वच्छ भारत मिशनमधून प्रोत्साहन निधी देण्याची योजना आहे. नगरपालिकेने आतापर्यंत 665 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी 12 हजाराची मदत केली आहे.

कर्जत नगरपालिकेला आतापर्यंत हागणदारी मुक्त अभियानामध्ये दोन स्टार मिळाले आहेत. त्यामुळे हागणदारी मुक्त शहराच्या यादीत तिसरे मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगरपालिका प्रशासनाने  जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाऐवजी नागरिकांनी वैयक्तिक शौचालयसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे. त्याचवेळी शहरात दोन ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट उभारले आहेत. दहिवली येथील मार्केटयार्ड आणि बाजारपेठमधील पे अ‍ॅड पार्क या ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. त्या ठिकाणी महिला वर्गासाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार असून तेथेच बसवलेल्या व्हेंडिंग मशीनमधून हे पॅड उपलब्ध होणार आहेत. शिवाय इनसिरेशन मशीन बसवून तेथे निर्माण होणारा नष्ट केला जाणार आहे. बाजारहाट करताना महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, अशी माहिती कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली.

Check Also

एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची

शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply