Breaking News

मुरूडमध्ये भगवान श्री महावीर जन्मकल्याणक उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त येथील जैन समाजातर्फे मुरूडमध्ये गुरुवारी (दि. 14) भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना नियमामुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीही मिरवणूक अथवा सण साजरा करता आला नव्हता परंतु यंदा नियम शिथिल होताच मुरूडमधील जैन मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रतिमा रथामध्ये ठेऊन ढोलताशांच्या गजरात संपूर्ण शहरात ही मिरवणूक काढण्यात आली.

मुरूड जैन समाजाचे अध्यक्ष  हसमुख जैन, ट्रस्टी गौतम जैन, सचिन शहा, छगनलाल जैन, सुरेश जैन यांच्यासह शहरातील जैन बंधू भगिनींनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply