अलिबाग : प्रतिनिधी
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवारी (दि. 14) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
कोविडमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा कोविडची बंधने काढण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात माणुसकी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आरसीएफ थळतर्फे कुरूळ वसाहतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागातर्फेदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी दिवसभर विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
पेण : प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती पेण शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्याधिकारी जीवन पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, सचिव सचिन कांबळे, नरेश गायकवाड, बौद्धजन पंचायत समिती आणि पीआरपी जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे, गंगाराम गायकवाड, सुशांत सुर्वे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनीही डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
खोपोली : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खोपोली येथील पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पक्षा तर्फे गुरुवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, जिल्हा कामगार सेल सहसंयोजक सूर्यकांत देशमुख, जिल्हा वैद्यकीय सेल संयोजक डॉ. नागरगोजे, सहसंयोजक विकास खुरपुडे, अनुसुचीत जाती मोर्चा अध्यक्ष हिम्मतराव मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, मीडिया सेलचे राहुल जाधव, विजय तेंडुलकर, जिल्हा महिला मोर्चा खजिनदार रसिका शेट्ये, स्नेहल सावंत, उपाध्यक्ष अपर्णा साठे, सरचिटणीस अश्विनी आत्रे, चिटणीस सुमिता महर्षि, विमल गुप्ते, मोगरे, सुनिल धायगुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
कर्जत : बातमीदार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी कर्जतमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. नगर परिषद कार्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कर्जत नगर परिषदच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका पुष्पा दगडे, स्वामींनी मांजरे, संचिता पाटील, मधुरा चंदन, वैशाली मोरे, विशाखा जिनगरे,तसेच प्राची डेरवणकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आदी उपस्थित होते.
रोहे : प्रतिनिधी
मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडण्ट असोसिएशन या संस्थेने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रोहे तालुक्यातील कोलाड गोवे येथील तटकरे तंत्रनिकेतनमध्ये 18 तास अभ्यास हा उपक्रम राबून जयंती साजरी केली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय्य प्राप्त केले पाहिजे, असे मत ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे यांनी या वेळी व्यक्त केले. रजिस्टार अजित तेलंगे, प्राचार्य विपूल मसाल, मेकॅनिकल इंजीनियरिंग विभाग प्रमुख रूपेश पवार, पंकज मोहीरे, करण भोजने, मनिष पाटील, प्रथमेश कासार यांच्यासह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
रोहे : प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रोह्यात बौद्ध समाज युवा संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
रोहा बस स्थानकात सकाळी 10.30 च्या सुमारास ओबीसी संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मगर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी बौद्ध समाज युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, संस्थापक रमेश शिंदे, माजी अध्यक्ष अमोल वाटवे, सचिव नरेश गायकवाड, सुविनय अहिरे, शरद कांबळे, जगदीश मोरे, अनंत दाभणे, निलेश धाइंजे, नारायण गायकवाड, रुपेश कांबळे, आतेश वाटवे, गौतम चव्हाण, सूरज पवार, स्वप्नाली कांबळे, सुविधा अहिरे आदी उपस्थित होते.
कर्जत : बातमीदार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त नेरळ पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी ठिकठिकाणी जाऊन अभिवादन केले.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळ, दहिवली, मोहाचीवाडी, निर्माण नगरी, कोल्हारे नवीन वसाहत, बोपेले, वरई, नांदगाव, कळंब, पाषाणे, साळोख, आर्डे, अवसरे, आसल, डिकसळ, वारे, खांडस, चिंचवली, वाकस, भडवल, ममदापुर, शेलू आदि ठिकाणी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव आयोजित करण्यात आला होता. नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, उपनिरीक्षक गिरीश भालचिम यांनी त्या ठिकाणी जाऊन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. डिकसळ येथील शांतिदूत मंडळाचे वतीने अॅड. उत्तम गायकवाड, सचिन गायकवाड, जीवक गायकवाड, प्रशिक गायकवाड यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे स्वागत केले. नेरळ पोलिसांच्या या उपक्रमाचे किशोर गायकवाड यांनी कौतुक केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper