पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रगती करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे केले.
भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण या विषयावर पनवेलमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकाम मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या उद्घाटन समारंभास आमदार डॉ. संजय कुटे, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, काही राजकीय पक्ष रस्त्यावर दगड उचलण्याचे व आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करण्याचे प्रशिक्षण आपल्या कार्यकर्त्यांना देत असताना भारतीय जनता पक्ष संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करीत आहे, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. भाषण करीत असताना काय बोलायचे यापेक्षा काय बोलायचे नाही हे ज्याला कळते तो चांगला वक्ता होतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Check Also
पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …