Breaking News

राजस्थानच्या पराभवाबरोबर प्ले-ऑफचे स्वप्न भंगले

दिल्ली : वृत्तसंस्था

येथील फिरोज शहा कोटला मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 5 गडी राखून मात केली असून या पराभवाबरोबच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, दिल्लीने प्ले-ऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केलेले आहे. गुणतालिकेत 18 गुणांसह दिल्ली दुसर्‍या स्थानी आहे.

राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 115 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने 116 धावांचे लक्ष्य 5 गड्यांच्या मोबदल्यात 16.1 षटकांत पार केले. दिल्लीच्या डावात ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी करत मोलाची कामगिरी बजावली. त्याने 38 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांनिशी 53 धावा केल्या.

दरम्यान, राजस्थानसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती या सामन्यात होती. खात्यात 11 गुण असलेल्या राजस्थानचा हा साखळीतील शेवटचा सामना होता आणि हा सामना जिंकल्यास राजस्थानसाठी प्ले-ऑफचे दरवाजे खुले राहणार होते, मात्र राजस्थानने सुमार कामगिरीमुळे ही संधी गमावली.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply