Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण

भाजप नेते संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; ओपन जिमचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस नवीन पनवेल सेक्टर 17 येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांच्या सौजन्याने वृक्षारोपण आणि नगरसेविका सुशीला घरत यांच्या निधीतून गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तुषार भगत, नितीन चोरघे, राजू पाटील, संजय भंडारी, भूषण म्हात्रे आदी उपस्थित होते. भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांनीही संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply