लवजी स्टेशनमध्ये पत्रकाराने वाचविले तरुणीचे प्राण

खोपोली : प्रतिनिधी

कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात लोकलमधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याक्षणी लोकलमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस फलाटावर ओढल्याने पुढील अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून मुंबईकडे जाणारी लोकल सायंकाळी सहाच्या सुमारास लवजी स्थानकात आली. तेथे एक तरुणी व तिची आई लोकलमधून उतरत असताना, तरुणीचा तोल गेला. व तिचे हात व पाय फलाट व लोकल मधल्या भागात जात असतानाच त्याच लोकलमधून प्रवास करीत असणार्‍या पत्रकार विनित जाधव यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणीला तात्काळ फलाटावर ओढले त्याचवेळी लोकलही सुरु झाली. त्या तरुणीची आई फलाटावर कोसळली होती. दोघी जणी सुखरूप आहेत. त्यानंतर त्या दोघीजणी रिक्षातून निघून गेल्यामुळे त्यांची नावे समजली नाही. पत्रकार विनित जाधव यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply