Breaking News

रोह्यात शिवप्रतिमेची मिरवणूक, चलचित्र, कवायती

रोहे : प्रतिनिधी

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतिने मंगळवारी शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी शहरातील राम मारूती चौकात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशा, लेझिम, चलचित्रे यासह विविध वाद्यवृंदावर राम मारूती चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विद्यार्थ्यानी विविध कवायती सादर केल्या. या मिरवणुकित आजी माजी नगरसेवक, नगर परीषद कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोहा शहरातील राम मारुती चौकातून निघालेली ही मिरवणुक  बाजारपेठ, तीनबत्ती नाका, बस स्थानक, नगर परिषद चौक, ते सी. डी. देशमुख शहर सभागृह येथे आली. तेथे मिरवणुकीचा  समारोप करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, शाळा  व विविध कला पथकांचा सत्कार करण्यात आला.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply