Breaking News

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल : वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवारकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा अनेकांनी लाभ घेतला.
या कार्यकमाला कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिंदे गटाचे गणेश वाघिलकर, अभि दुर्गे, फाल्गुनी दुर्गे, चंद्रकांत मंजुळे, नीता मंजुळे, भरत जाधव, बाळा जाधव, प्रसाद म्हात्रे, अमरिश मोकल, रूपाली शिंदे, संजू पाटील, गौरव बांठिया यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply