उरण : रामप्रहर वृत्त
उरण येथे झालेल्या जिल्हास्तरीय द्रोणागिरी मॅरेथॉनमध्ये लकी स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. त्यांचे कौतुक होत आहे.
14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये पाच किमी शर्यतीत सार्थक संजय पाटील (दिघोडे) प्रथम क्रमांक, मिहीर अनंत माळी (दिघोडे) तृतीय, 14 वर्षाखालील मुलींच्या तीन किमी शर्यतीत दिव्या महेंद्र ठाकूर (धुतूम) द्वितीय, 18 वर्षाखालील मुलींच्या पाच किमी शर्यतीत तनिष्का गंगाराम थळी द्वितीय (विंधणे), 18 वर्षाखालील मुलांच्या 10 किमी शर्यतीत दीप अजित मोहिते (दादरपाडा) द्वितीय, यश कैलास पाटील (दिघोडे) पाचवा क्रमांक, महिलांच्या 10 किमी शर्यतीत साक्षी कैलास पाटील (दिघोडे) चौथा क्रमांक व ईश्वरी मनोहर चिर्लेकर (विंधणे) हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.
याचबरोबर नवीन पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय फ्रेंडशिप मॅरेथॉन व ऑल इंडिया आपले पुणे मॅरेथॉनमध्ये श्रेया प्रल्हाद पाटील (दिघोडे) हिने सुवर्णपदक, साक्षी कैलास पाटील व दिव्या महिंद्र ठाकूर यांनी रौप्यपदक पटकाविले. सर्व यशस्वी धावपटूंचे अभिनंदन होत आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper