Breaking News

महिला परिचरांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांनी मंगळवारी (दि. 23) येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महिला परिचर  शासकीय कामे करतात, परंतु सहा- सहा महिने मानधन मिळत नाही. हे मानधन दरमहा व वेळेत मिळावे, महिला परिचर यांना किमान वेतन 18 हजार रुपये मिळावे, कोरोना काळात गावागावातून विविध सर्व्हे करणे, रुग्णांना औषधे पोहोचविणे, घरोघरी जावून कोरोना रुग्णांबाबत  माहिती  मिळविणे, विलगीकरणातील रुग्णांना मदत करणे, अशी अनेक कामे महिला परिचर  यांनी  केली आहेत.  त्याचा  प्रोत्साहनपर भत्ता मिळलेला नाही. हा प्रोत्साहनपर भत्ता जिल्हा परिषद सेस फंडातून देण्यात यावा, गणवेश, छत्री, टॉर्च, बूट इत्यादी साहित्य पुरवावे, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे  पेन्शन मिळावी, विमा कवच मिळावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

महिला परिचर संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष ललिता दिवेकर, सरचिटणीस रेश्मा ठाकूर, तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, महिला परिचर संघटनेच्या अश्विनी म्हात्रे, शोभा भगत, शैलजा भोईर, हर्षदा खारकर, मिनाक्षी पाटील, प्रणाली मोहिते यांच्यासह महिला परिचर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply