Breaking News

नवी मुंबईकरांवर कचरा वर्गीकरणाचे संस्कार

नवी मुंबई : बातमीदार

घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा भाग हा कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी केले जाणारे ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये स्वयंस्फुर्तीने कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत ओला व सुका कचरा याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी स्वच्छता के दो रंग ही मोहीम 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने याकामी आघाडी घेतली आहे. याबाबत मुलांमधील मोबाइल गेम्सची आवड लक्षात घेऊन हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते इन्स्टाग्रामवर प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट) हा कचरा वर्गीकरणाविषयीचा स्पेशल गेम लाँच करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते. या गेममध्ये ओल्या कचर्‍यामध्ये कोणते घटक येतात व सुक्या कचर्‍यामध्ये कोणते घटक येतात याविषयीचे मुलांचे ज्ञान जाणून घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर लाँच केलेल्या प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट) हा गेम खेळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाालेपश्रळपश या इन्स्टाग्राम पेजवर जाऊन अथवा https://www.instagram.com/ar /634271571616316 ऑनलाइन लिंकवर जाऊन सहजपणे कचरा वर्गीकरणाचा हा गेम खेळता येऊ शकतो. या गेमच्या सुरुवातीला लिंकवर क्लिक केल्यानंतर गेम खेळणार्‍या व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट दिसू लागेल व त्या मुकुटाच्या एका बाजूला ओलू म्हणजे ओला कचरा व दुसर्‍या बाजुला सुकू म्हणजेच सुका कचरा याचे आयकॉन दिसतील. मुकुटाच्या मध्यभागी एकेक करून कागद, फुले, फळे अशा साहित्याची नावे दिसतील. त्यामधील ओल्या कचर्‍यात जाणारे साहित्य कुठले व सुक्या कचर्‍यात जाणारे साहित्य कुठले हे ओळखून मुलांनी डाव्या किंवा उजव्या बाजूला मान झुकवली की योग्य उत्तरानुसार त्यांना मिळालेले गुण प्रदर्शित होतात. यामुळे मुलांना कोणता कचरा कोणत्या डब्यात याविषयीचे कचरा वर्गीकरणाचे आपोआप ज्ञान मिळणार असून हसत खेळत कचरा वर्गीकरणाची माहिती प्राप्त होणार आहे.  लहान वयापासूनच मुलांवर स्वच्छतेचे संस्कार करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरंभापासूनच कार्यरत आहे. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या राजीव गांधी स्टेडियम सीबीडी बेलापूर येथील इंडियन स्वच्छता लीगच्या भव्यतम विक्रमी कार्यक्रमात नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार, सुप्रसिध्द गायक संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत घनकचरा वर्गीकरणाविषयी जनजागृतीपर व्हिडिओ क्लिपचे अनावरण करण्यात आले होते. लहान मुलांमध्ये असलेली कार्टून्सची आवड लक्षात घेऊन या व्हिड़िओ क्लिपमध्ये ओल्या कचर्‍यासाठी ओलू आणि सुक्या कचर्‍यासाठी सुकू ही कच-याच्या डब्याच्या आकाराची दोन कार्टून पात्रे प्रदर्शित करण्यात आली होती. याद्वारे उरलेले अन्नपदार्थ, फळांच्या साली, भाज्या, फुले असा कचरा ओलू म्हणजेच ओला कचरा आहे आणि कागद, काच, टाकाऊ स्टेशनरी साहित्य, धातूचे साहित्य हे सर्व सुकू म्हणजेच सुका कचरा आहे अशी महत्वाची माहिती कार्टून्सद्वारे मुलांपर्यंत पोहचविण्यात आली होती. याशिवाय डायपर, सिरींज, सॅनिटरी नॅपकीन असे साहित्य घातकू’ म्हणजेच घरगुती घातक कचरा आहे ही माहिती काळ्या रंगाचा कार्टून पात्र स्वरुपातील कचर्‍याचा डबा प्रदर्शित करीत मुलांना देण्यात आलेली होती.

मोबाइल गेमद्वारे जनजागृती

केंद्र सरकारच्या स्वच्छता के दो रंग या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याविषयी ‘ओलू’ व ‘सुकू’ या नवी मुंबई महापालिकेने प्रदर्शित केलेल्या कार्टून पात्रांची मुलांमधली लोकप्रियता लक्षात घेऊन तसेच मुलांना असलेली मोबाइल गेमची आवड लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण रितीने प्ले-वेस्ट सेग्रीगेशन या इन्स्टाग्रामवरील खेळाची रचना करण्यात आलेली आहे. असून नवी मुंबईतील हुशार मुले स्वत: हा खेळ खेळून ओल्या कचर्‍यात कोणते साहित्य व सुक्या कचर्‍यात कोणते साहित्य याविषयी आपल्याला असलेल्या माहितीची खेळाद्वारे खातरजमा करून घेतलीच, याशिवाय आपल्या पालकांनाही हा खेळ खेळायला लावून त्यांनाही कचरा वर्गीकरणाचे महत्त्व जाणवून देतील, असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply