Breaking News

मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
पनवेल शहर व तालुका भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास कळंबोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमल कोठारी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, देवांशु प्रभाळे आदी उपस्थित होते.
या वेळी मनसे कार्यकर्ते रामदास जगताप, लक्ष्मण फणसे, सुभाष कंके, शीतल राणे, किरण दळवी, ओमप्रकाश घाटे, मनोजकुमार महाडिक, प्रमोद सावंत, गौतम गायकवाड, रविराज पवार, प्रल्हाद घाणेकर, शिवराम डोंगरे, नारायण नरवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply