Breaking News

रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी प्रदान

मान्यवरांसह दोन लाखांहून अधिक श्रीसदस्यांची उपस्थिती

नवी मुंबई ः प्रतिनिधी
राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना मानाची डि.लिट. पदवी रविवारी (दि. 5) प्रदान करून सन्मान करण्यात आला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. या वेळी दोन लाखांहून अधिक श्रीसदस्य उपस्थित होते.
सोहळ्यास ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. पूनम महाजन, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनोद टीब्रेवाल, विद्यापीठाचे संचालक मंडळ, धर्माधिकारी कुटूंबीय आणि असंख्य श्रीसदस्य उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply