Breaking News

रायगड जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे.

डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपत्कालीन परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून रायगडकरांचे पालकत्व स्वीकारले होते. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी तत्काळ सोडविले होते, तर कोरोना कालावधीत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. 2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे डॉ. महेंद्र कल्याणकर कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यानंतर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून योग्य भूमिका बजावली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply