Breaking News

भाजप सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांचे रायगडातील पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन

महाड दौर्‍यात महापुरुषांना अभिवादन

महाड : प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी बुधवारी (दि. 4) महाडचा दौरा करीत पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांचे पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सहकार्‍यांनी जोरदार स्वागत केले.
उत्तर व दक्षिण जिल्हा पदाधिकारी कोअर बैठकीसाठी शिवप्रकाश हे महाड येथे आले होते. या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रथम चवदार तळे येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच नंतर किल्ले रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.
या दौर्‍यात प्रदेश कार्यालयीन महामंत्री रवींद्र अनासपुरे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, बिपीन महामुणकर, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष राजेश मपारा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, हेमा मानकर, युवा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमित घाग, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप रोहा तालुका सोपान जांबेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply