Breaking News

श्रीरंग बारणे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरोद्वागार

पिंपरी : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. ते नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ख्याती असल्याचे, गौरोद्वागार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.  श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तिमत्वांचा आणि संस्थांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी (दि.16) पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार बारणे यांचे अभिष्टचिंतनही करण्यात आले. माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे, माजी खासदार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी आणि शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे प्रयत्न केले. ते जनतेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे जनतेचा खासदार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. माजी खासदार शिवाजीराव पाटील म्हणाले, देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचे ’रेकॉर्ड’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर आहे. ते अभ्यासपूर्णपणे प्रश्नांना वाचा फोडतात. सर्वांच्या मदतीला धावून जातात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार, कार्यवाह विश्वजीत बारणे यांनी परिश्रम घेतले. तर, अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान पर्यावरण भूषण, वसंत काटे उद्योगरत्न, माया रणवरे दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे  सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले दुर्गारत्न, विजयन शिक्षणरत्न, शेखर कुटे वारकरी भूषण, संगीता तरडे दुर्गारत्न, अमरसिंह निकम आरोग्य भूषण, वृशाली मरळ आधारभूषण, संतोष कनसे श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे समाजभूषण, जयदेव म्हमाणे क्रीडारत्न, प्रमोद शिवतरे समाजभूषण, अनिल साळुंखे समाजरत्न आणि शुंभकर को-हौसिंग सोसायटीला आदर्शभूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित केले.

जनतेच्या पाठींब्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. मागील अडीच वर्षे कामे होत नव्हती. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यात 100 कोटी रुपयांचा निधी मावळसाठी मिळाला आहे. कार्ला येथील आई एकविरा देवीच्या परिसर वाहतूक कोंडी आणि अपघातांचा ’ब्लॅकस्पॉट’ होत असलेल्या कार्ला फाटा येथे ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहे.

-खासदार श्रीरंग बारणे

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply