माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील मुगवली गावच्या हद्दीत मिनीबसने दिलेल्या धडकेत एसटी बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) पहाटे 1.15च्या सुमारास घडला.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून महाडकडे चाललेल्या मिनीबसचा (एमएच 14-सीडब्लू 5508) चालक दिनेश दत्तात्रेय घबाड (वय 32, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड, जि. पुणे) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणार्या देवगड-नालासोपारा एसटी बसला धडक दिली.
या अपघातात एसटी बसमधील विनायक विष्णू साटम (वय 60, रा. देवगड जि. सिंधुदुर्ग), माया देवदास गोसावी (वय 32, रा. कुडाळ जि. सिंधुदुर्ग), शुभांगी रमेश तावडे (वय 69), रमेश महादेव तावडे (वय 73, दोघे रा. राजापूर जि. रत्नागिरी), उज्ज्वला उदय चौगुले (वय 55), उदय धोंडू चौगुले (वय 51, दोघे रा. सिंधुदुर्ग) आणि दिनेश मनोहर कदम (वय 39, रा. साईनगर, माणगाव, सध्या रा. विरार, जि. ठाणे) जखमी झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस सुरू आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper