Breaking News

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी  उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नेरूळ येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या  या पक्ष सोहळ्यावेळी माजी उपमहापौर अशोकराव गावडे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा संघटक शितलताई कचरे, महिला जिल्हा संघटक सरोजताई पाटील, शहरप्रमुख सुरेश भिल्लांरे, शहरसंघटीका सुरेखा गव्हाणे,प्रियांकाताई गाडे, उपजिल्हाप्रमुख रामाशेठ वाघमारे, नवी मुंबई सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे, उपजिल्हा प्रमुख अजय पाटील, माजी सैनिक सेनेचे जिल्हा संघटक सुरेश काकडे, अल्पसंख्याक सेलचे नवी मुंबई जिल्हा संघटक बरनोडशहा नाडर, दुधभाते आदी उपस्थित होते. महिलांकडे योग्य नियोजन असते, त्यांच्याकडे संघटन कौशल्य असते. पक्ष संघटन  विस्तार होण्यास महिलांच्या अंगभूत गुणांची  मोठ्या प्रमाणात मदत होते शिवाय महिलांच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम होण्यासाठी राजकारणात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे  शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी बोलताना सांगितले. तरुणाई उद्याचे भविष्य आहे त्यांनी पुढे येऊन विविध विधायक कार्यक्रम राबवून शिवसेना पक्षाची पताका उंचावत ठेवावी महिला आणि तरुणांना सोबत  आम्ही खंबीरपणे उभे आहोत असे उपमहापौर अशोकशेठ  गावडे यांनी सांगितले. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकानी गर्दी केली होती.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply