पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी खारघर येथील गोखले शाळेच्या मैदानात रंगलेल्या युवा वॉरियर्स व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते, तर खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या युवा वॉरियर्स फुटबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुटबॉल स्पर्धेला भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.
खारघरमधील हॉलीबॉल चषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, माजी नगरसेवक हरेश केणी, रामजी बेरा, प्रवीण पाटील, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दीपक शिंदे, किरण पाटील, विजय पाटील, रमेश खडकर, वासुदेव पाटील, विपूल चौतालिया, प्रभाकर बांगर, दिनेश खानावकर, विनोद घरत, नितेश पाटील, शुभ पाटील, अतुल पाटील, अक्षय लोखंडे, बंटी मोहंती, प्रमोद पाटील, सोनिया गवाणे, विजयालक्ष्मी सरकार, संतोष शर्मा, सचिन वास्कर, अनिल खोपडे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू उपस्थित होते.
खांदा कॉलीतील फुटबॉल चषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, देवांशु प्रभाळे, शुभम कांबळे, अक्षय सिंग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू उपस्थित होते.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper