Breaking News

उपजिल्हा रुग्णालयातील स्वॅब मशिन हलविण्याची मागणीय; डिकसळमधील ग्रामस्थांचा तीव्र विरोध

कर्जत ः बातमीदार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची टेस्ट घेण्यासाठी स्वॅब मशिन बसविण्यात आले आहे. ते मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला हलविण्यात यावे, अशी मागणी कर्जतमधील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. दरम्यान, स्वॅब मशिन डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलविण्यास तेथील ग्रामस्थांनी मात्र विरोध केला आहे.

कोविड थ्रोट मशिन कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्वॅब देण्यासाठी कर्जत तालुक्यातील विविध भागातून लोकांची गर्दी होत असते. त्याचा थेट परिणाम कर्जत शहरातील जनता आणि बाजारपेठेवर होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेले थ्रोट मशिन तेथून कर्जत-नेरळ रस्त्यावर असलेल्या रायगड हॉस्पिटल, डिकसळ येथे हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून पेशंट बाहेरच्या बाहेर तपासणी करून जाऊ शकतात. सामान्य माणूस सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी, सर्प चावलेले किंवा अपघात तसेच साथीच्या इतर आजारांवर उपचारासाठी येत असतो. कोरोना तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांच्या सान्निध्यात सरकारी हॉस्पिटलचे रुग्ण येण्याची दाट शक्यता आहे. तसे घडल्यास हॉस्पिटल सील होण्याची भीती आहे. सर्वसामान्य, गोरगरिबांना सरकारी दवाखाना एकमेव आधार ठरत आहे. निवेदनाची दखल घेऊन त्वरित कोविड थ्रोट टेस्ट मशिन सरकारी हॉस्पिटलमधून रायगड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबतचे निवेदन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी धर्मेंद्र मोरे, प्रदीप ढोले, राहुल गायकवाड, सुनील वाघमारे आदी उपस्थित होते, मात्र कर्जत शहरातील स्वयंसेवी संघटनांनी ही मागणी केल्यानंतर डिकसळ गावातील ग्रामस्थांनी तत्काळ रायगड हॉस्पिटल येथे धाव घेतली. या वेळी ग्रामस्थांनी रायगड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही स्थितीत स्वॅब टेस्टिंग मशिन आणू नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी ग्रामस्थ तेथे थांबून राहिले. सर्व ग्रामस्थांना एकत्र करण्यासाठी उत्तम गायकवाड, ज्ञानेश्वर साळोखे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply