Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 14) खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते असणार आहे.

इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

  • छगन भुजबळ: अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीप वळसे-पाटील : सहकार
  • राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  • सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • हसन मुश्रीफ: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  • चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • विजयकुमार गावित: आदिवासी विकास
  • गिरीष महाजन: ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटन
  • गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी भुसे: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संजय राठोड: मृद व जलसंधारण
  • धनंजय मुंडे: कृषी
  • सुरेश खाडे: कामगार
  • संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत: उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • अब्दुल सत्तार: अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • धर्मरावबाबा आत्राम: अन्न व औषध प्रशासन
  • अतुल सावे: गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क
  • आदिती तटकरे: महिला व बालविकास
  • संजय बनसोडे: क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  • मंगलप्रभात लोढा: कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  • अनिल पाटील:मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply