Breaking News

शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.  या स्पर्धेत विद्यालयाच्या अकरावी आणि बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या मुलांनी 19 वर्षाखालील गटात सहभाग घेतला होता.
कार्तिकगोपन, राजदीप धामी, अभय सिंग, रिहानगुडेकर, आनंदपराते, आर्यनभातुसे, हमजामुल्ला, दिग्विजय नेटके, नीरजकदम, साहिल शेख या विद्यार्थ्यांच्या टीमने तृतीय क्रमांकाला गवसणी घातली. त्यांना क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील व संभाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,  संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, सचिव डॉ.एस. टी.गडदे, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य निशा नायर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Check Also

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह …

Leave a Reply