Breaking News

गव्हाणमध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा समारंभ पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि पं.स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

गव्हाण येथील शांतादेवी मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, भाजप महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, श्वेता खैरे, ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, गिरीजा कातकरी, माई भोईर, सुनिता घरत, जयश्री कोळी, जिज्ञासा कोळी, दमयंती कोळी, कुसुम ठाकूर, नर्मदा घरत, यमुना पाटील, मनीषा ठाकूर, अरुणा कोळी, कल्पना ठाकूर यांच्यासह महिलावर्ग उपस्थित होता.

या वेळी झालेल्या विविध खेळांमध्ये परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन बक्षिसे जिंकली. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply