Breaking News

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

कर्जत, नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाचे नेते, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी समर्थकांसह शनिवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा पक्षप्रवेश झाला.
सुरेश लाड हे तीन टर्म आमदार होते. चांगला जनसंपर्क आणि ग्रामीण भागासह शहरावर प्रभूत्व असलेला नेता अशी त्यांची कर्जत मतदारसंघात ओळख आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बेहेरे, नितीन पाटील, चारुशीला घरत, प्रकाश बिनेदार, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, चिटणीस मंगेश म्हस्कर, नितीन कांदळगावकर, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगाटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार सुरेश लाड यांच्या भाजप प्रवेशाने रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून सुरेशभाऊंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली.
माजी आमदार सुरेश लाड यांच्यासोबत खालापूर पंचायत समितीचे सभापती नरेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, महिला तालुका अध्यक्ष श्वेता मनवे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय हजारे, युवक अध्यक्ष राजू हजारे, कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे, वेणगावचे माजी सरपंच देविदास बेडेकर, ज्येष्ठ उद्योगपती राम राणे, माजी शहराध्यक्ष नंदकुमार लाड, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके, होनाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच समीर देशमुख, सागाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील सुखंदरे, गोरठण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राकेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply