लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अधिकाधिक गुण संपादन करीत यश मिळवायला हवे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर येथे केले.
बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी शुभचिंतन तसेच मिनी सायन्स लॅबचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.15) आयोजित करण्यात आला होता. दीपक फर्टीलायझर्स तळोजाच्या आर्थिक सहाय्यातून मिनी सायन्स लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, दीपक फर्टीलायझर्सचे सिनिअर जनरल मॅनेजर सतीश देसाई, संतराम चलवाड, संदीप काकडे, दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोपी, उपसरपंच जयदास चौधरी, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बळीराम भोपी, बाळाराम भोपी, विलास भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, विष्णू भगत, कृष्णा पाटील, पोलीस पाटील दीपक पाटील, माजी सरपंच अनुराधा वाघमारे, जयवंत भोपी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, क्रीडा प्रमुख अमित पाटील, शासकीय ग्रेड परीक्षेत कलाशिक्षक चेतन भोईर आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला, तर स्टेज मॅनेजमेंटवरील संशोधन इंटरनॅशनल जनरल ऑफ क्रिएटिव्ह रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाल्याबद्दल माळी मॅडम, शासकीय एनएमएमएस परीक्षेत विद्यालयाचे श्रेया बोराडे, अभय सुरवडे या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल तसेच एनएमएमएस विभाग प्रमुख गंधे आणि रयत रायगड विभाग वक्तृत्व स्पर्धेत विभागीय पातळीवर प्रथम क्रमांकप्राप्त आदिती भोपी, विभाग प्रमुख डाऊर मॅडम आणि विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.