पनवेल, सातारा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले.शुन्यातून केलेली सुरुवात आज हजारो लोकांना माझ्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकलो. त्याच प्रमाणे केबीपी इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी भविष्यात रोजगार निर्मिती करणारे उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार, मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
वर्ये (सातारा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँन्ड रिसर्चचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विकास देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि स्वागत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी. एस.सावंत यांनी करून इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. या वेळी गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय कार्य करणार्या प्राध्यापकांचा, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय, जिल्हास्तरीय विविध स्पर्धेतील यशस्वी खेळाडू, संशोधन स्पर्धेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्यांचा या वेळी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी, अपयशाने खचून जाऊ नका, यशाने हुरळून जाऊ नका, असे सांगून नाविन्यपूर्ण विचार आणि योग्य प्रयत्न करा. पराकष्ट करणारेच यशस्वी होऊ शकतात, असे विद्यार्थ्यांना सांगितले. वार्षिक अहवाल वाचन प्रा. प्रियांका लोखंडे, आभार प्रा. गौरव जाधव यांनी मानले.
केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला 11 लाख रुपयांची देणगी
रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर अपार श्रद्धा ठेवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख आहे. आत्तापर्यंत ठाकूर कुटुंबातील सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेला जडणघडणीसाठी तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक रक्कम देणगी दिली आहे. दातृत्वाचा झरा असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला याच कार्यक्रमात 11 लाख रुपयांची देणगी दिली.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …