आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत
मोहोपाडा : प्रतिनिधी
उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, तुपगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र कुंभार, उपसरपंच सुयोग भालेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन साखरे, स्वप्नील नागावकर, आरोग्य सेल अध्यक्ष खालापूर विजय ठोसर, माजी उपसरपंच गणेश कदम, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षामध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच भविष्यामध्ये तुपगाव गावाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.