भाजपच्या पाठपुराव्यामुळे पनवेल परिसराचा विकास -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष जो शब्द देतो तो पूर्ण करून दाखवतो. पनवेल परिसराचा विकास हा भाजपच्या पाठपुराव्यामुळेच झाला. त्यामुळे विरोधक जे चुकीचा प्रचार करत आहेत त्याला उत्तर द्या, असे प्रतिपादन पनवेल विधानसभा मतदारसघांचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये केले.
भाजप अनुसूचित जाती मोर्चा खारघर मंडळाचा संवाद मेळावा रविवारी (दि. 20) सेक्टर 19मधील श्री. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या मेळाव्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, हरेश केणी, माजी नगरसेविका आरती नवघरे, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमरीश मोकल, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, विधानसभा विस्तारक सागर मोरे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष साधना पवार, जिल्हा संयोजक राजेंद्र अग्रवाल, बिना गोगरी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, सीमा खडसे, शामला शेट्टीगर, संतोष शर्मा, समीर कदम, प्रभाग 6 अध्यक्ष रामचंद्र पाटील, अरुण सोळंकी, प्रदिप शेलार, मंगल घोलप, अनुसूचित जाती मोर्चाचे खारघर मंडळ अध्यक्ष संदीप माघाडे, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपने केलेल्या पाठपुराव्यामुळे पनवेलचा विकास झाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यामातून ठरवण्याची वेळ आली आहे आपल्याला सातत्याने फसवणूक करणारे पाहिजेत की, विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारे भाजप महायुतीचे सरकार पाहिजेत, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. इतर नेत्यांचीही समयोचित भाषणे झाली.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply