खालापूर ः रामप्रहर वृत्त
खालापूर येथे तालुका भाजपच्या वतीने आयोजित क्रिकेट महोत्सवात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 7) जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले.
मंचावर भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, विकास रसाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नागेश पाटील, भाजप खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप, हरिभाऊ जाधव, आबा देशमुख, प्रवीण पाटील, महड बूथ अध्यक्ष हेमंत पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
या वेळी भाजपचे खालापूर तालुका प्रभारी मंडल अध्यक्ष सनी यादव व कर्जत विधानसभा युवा संयोजक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली उंबरे ग्रामपंचायतीमधील हरेश पाटील, सत्कार पाटील, ओंकार पाटील, विराज पाटील, धीरज पाटील, राजेश पाटील, गणेश पाटील, वैभव पाटील, अनिल पाटील, सुनील पाटील, अनिकेत पाटील, मंगेश पाटील, रमेश पाटील, जगदीश आखाडे, भरत आखाडे, बाळाराम आखाडे यांनी; तर खालापूर नगरपंचायत हद्दीतील महड येथील निलेश पाटील, जयेश पाटील, अविनाश पाटील, नितेश पाटील यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षात स्वागत केले.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper