पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या संघटन पर्व अभियानांतर्गत मंडल अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्हा कोअर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका शुक्रवारी (दि. 18) राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झाल्या.
यामध्ये रायगड दक्षिण, रायगड उत्तर, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, सिंधुदुर्ग, भिवंडी, ठाणे शहर, उल्हासनगर या विभागांचा समावेश होता. या बैठकांच्या अनुषंगाने आगामी दोन दिवसांत भाजप मंडल अध्यक्ष निवड जाहीर करण्यात येणार आहे.
विविध बैठकांदरम्यान मंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार विनय नातू, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कार्यकारिणी सदस्य मनोहर केमचंदानी, महामंत्री माधवी नाईक, राजेश पांडे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper