पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सभागृह तसेच शुशोभीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून सोमवारी (दि.12) ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
सारनाथ मित्रमंडळ चिंध्रण यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमा आणि संयुक्त जयंती महोत्सवाचा आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, एकनाथ देशकर, चिंध्रण गावचे सरपंच एकनाथ पाटील, माजी उपसरपंच अनंता कडू, ग्रामपंचायत सदस्य मनोज कुंभारकर, माजी सदस्य सुरेश मुंबईकर, माजी सरपंच गणपत कडू, तुकाराम पाटील, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा कमला देशेकर, माजी उपसरपंच दिनेश पाडेकर, माजी उपसरपंच शंकर देशेकर, माजी उपसरपंच अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, बाबुशेठ मुंबईकर, रोहिदास पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत देशेकर, दीपिका सोनावले, माजी उपसरपंच नरेश सोनावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper