पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पक्षात सवागत केले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 22) भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज-म्हात्रे, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, भाजप पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रूपेश नागवेकर, महिला मोर्चा अध्यक्ष रूचिता लोंढे-समेळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते.
या वेळी मनसे विद्यार्थी सेनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिमेष अमित ओझे, पनवेल शहर अध्यक्ष केदार रेवाळे, प्रभाग 17 अध्यक्ष ऋषिकेश सावंत, तालुका सचिव आकाश गाडे, प्रभाग 19 अध्यक्ष अभि रिंगे, आकाश दलाल, हिमांशु पाटील, पराग भातणकर, प्रणय मोहिते, तन्मय मोरे, सौरभ रामधरणे, रूद्र पाटील, प्रभंजन गाडगीळ, प्रथम दासरी, प्रथम ठाकरे, प्रसाद धवळे, मृण्मय पाटील, शिवराज बोबडे, हर्षद घाटे, आशुतोष पाटील, रोहित धामणस्कर, हर्ष जेटवा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper