Breaking News

उरणमधील कळंबुसरेला वादळी पावसाचा तडाखा

आमदार महेश बालदी यांच्याकडून पाहणी आणि मदत

उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 26) तातडीने गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी गरजूंना तातडीची आर्थिक मदतही दिली.
आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रशासन सज्ज असून उरणचे तहसीलदार उद्धव कदम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश आमदार बालदी यांनी दिले आहेत.
पाहणी व मदत देतेवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, उरण ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, माजी जि.प. सदस्य जीवन गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, माजी सरपंच सुशील राऊत, माजी विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, रत्नाकर राऊत, अनंत गावंड, प्राचार्य रमांकांत गावंड, प्रवक्ते करण ठाकूर, उद्योजक देवेंद्र पाटील, रूपेश पाटील, राजेश पाटील, सुरेंद्र राऊत, विल्सन भोईर, प्रसाद पाटील, बाळ राऊत, बंडू घरत, सूरदास राऊत, संदेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आपत्तीच्या या काळात कोणीही एकटे नाही. शासन आणि प्रशासन तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन आमदार बालदी
यांनी नुकसानग्रस्तांना दिले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply