उलवे नोड : रामप्रहर वृत्त
सर्वांनी एकसंध राहून सर्व प्रश्न सोडवून परिसराचा विकास करूया, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) खारकोपर येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील खारकोपर येथील अंतर्गत रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या निधीमधून करण्यात येणार आहे. हे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे तसेच माजी उपरपंच विजय घरत आणि किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे.
भूमिपूजन समारंभास भाजप नेते रविशेठ पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी उपसरपंच अमर म्हात्रे, अनंता ठाकूर, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, निलेश खारकर, निकिता खारकर, सुनील ठाकूर आशिष म्हात्रे, मनोज घरत, धीरज ओवळेकर, वितेश म्हात्रे, गायकवाड गुरुजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोपर, शिवाजीनगर, शेलघरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper