कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार, अभीष्टचिंतन सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन 1 जून रोजी करण्यात आले आहे.
पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार्या या साहित्यिक कार्यक्रमांमध्ये दुपारी 2 वाजता कविसंमेलन होणार आहे. या कविसंमेलनासाठी कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अरूण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व… या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, संपादक शैलेश शिर्के, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर सहभागी
होणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील, कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात पनवेलचे नाव उंचवणार्या व्यक्ती व संस्थांना सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या साहित्यिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper