पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74 वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने तीन दिवस भव्य स्वरूपात ’कीर्तन महोत्सव’ होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचे सर्व क्षेत्रातील योगदान नेहमीच आदर्शवत राहिले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन व अर्थसहाय्य केले आहे, त्याचबरीबरीने अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोलाचे आहे, मंदिरे बांधणे, मंदिराचे जिर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत केली आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा अध्यात्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
दानशूरता, समाजसेवा आणि अष्टपैलू कर्तृत्व यांच्या अद्वितीय संगमामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखं व्यक्तिमत्व संपूर्ण जिल्ह्यात दुर्मिळच आहे. त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्णय लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीने घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पण निमित्त अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला अध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे. यामध्ये संगीत भजन, हरिपाठ, हरी कीर्तन आणि अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी तीन दिवस कीर्तन साथकरी म्हणून पनवेल, उरण, खालापूर परिसरातील समस्त वारकरी संप्रदायातील गुणीजन मंडळांची साथ लाभणार आहे.
शनिवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 2 वाजता या महोत्सवाची सुरुवात प्रतिमा पूजनाने आणि दुपारी 03 वाजता रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या भजनाने होणार आहे. सायंकाळी 04 वाजता 50 हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, त्यानंतर सायंकाळी 5. 30 वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी 7 वाजता ह.भ. प. उमेश महाराज दशरथे (परभणी) यांचे हरिकीर्तन त्यानंतर रात्री 9 वाजता महाप्रसाद होणार आहे. रविवार 1 जून रोजी दुपारी 2. 30 वाजता शिवशंभो प्रासादिक मंडळ (चिंचिवली गोहे) यांचे भजन, सायंकाळी 4 वाजता 45 हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी 5. 30 वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी 7 वाजता संत माणकोजी महाराज बोधले यांचे 11 वे वंशज ह. भ. प. ऍड. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे हरिकीर्तन, रात्री 09 वाजता महाप्रसाद तर सोमवार दिनांक 02 जून रोजी दुपारी 2. 30 वाजता नाद ब्रह्म साधना भजन मंडळाचे भजन, सायंकाळी 4 वाजता 46 हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी 5. 30 वाजता आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, सायंकाळी 7 वाजता ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे (अंबरनाथ) यांचे हरिकीर्तन आणि वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि रात्री 9 वाजता महाप्रसाद होणार आहे, अशी माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
Check Also
Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen
Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …
RamPrahar – The Panvel Daily Paper