Breaking News

पनवेल शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया -आमदार प्रशांत ठाकूर

पर्यावरण दिनी महापालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने एक लक्ष वृक्षारोपणासाठी उचललेले पाऊल हे निश्चितच अभिनंदनीय व पनवेलच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. त्यामुळे पनवेल शहर अधिकाअधिक सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपण नागरिकांनीही कटिबद्ध व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेल महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने गुरुवारी (दि. 5) वडाळे तलावाजवळील महामार्गालगत सुमारे 40 रोपांचे रोपण करण्यात आले तसेच कापडी पिशवी विक्री केंद्र आणि पुर्नवापर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. कापडी पिशवीसाठीची आधुनिक मशीन व ई-वेस्ट कचरा संकलन या महत्त्वाच्या बाबीही पनवेल मनपाने सुरू केल्या आहेत. त्याचा उपयोग पनवेलकरांनी अधिकाधिक करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, वृषाली वाघमारे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, परिवहन उपव्यवस्थापक अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटकेर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, विभाग प्रमुख अनिल कोकरे, महापालिका अधिकारी, महावीर इंटरनॅशनल संस्थेचे पदाधिकारी, निसर्गमित्र संस्थेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर परेश ठाकूर म्हणाले की, प्लास्टिकमुक्तीसाठी महापालिकेने कापडी पिशवी वेडिंग मशीन बसविली आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. याबरोबरच महापालिकेने एक लाख झाडे लावण्याचा उत्तम निर्धार केला आहे. महापालिकेने याबाबत केलेले नियोजन पाहता हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जाईल यात शंका नाही
कापडी पिशवी विक्री मशीन व पुर्नवापर प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन केंद्र याबाबत उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सविस्तर माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी पर्यावरण रक्षणाबाबत हरित शपथ घेण्यात आली.
बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. याची सुरुवात पर्यावरण दिनानिमित्ताने महापालिकेच्या चारही प्रभागात 1100 झाडांचे रोपण करण्यात आले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply