पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोणताही पक्षभेद न मानता काम केले की पक्ष वाढतो. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारत उद्घाटनावेळी केले.
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या स्वनिधीतून आंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य इंदुमती पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे सचिव कर्णिक पाटील, भाजप नेते अरुण घरत, बेलपाडा गाव अध्यक्ष संतोष म्हात्रे, जे.डी. ठाकूर, वसंत म्हात्रे, गणेश पाटील, नामदेव पाटील, जगदीश पाटील, किरण म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, अशोक घरत, प्रवीण म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, अंकुश पाटील, नाथा घरत, तुकाराम ठाकूर, अतिश पाटील, प्रकाश कडू, पंकज पाटील, अशोक पाटील, मधुकर म्हात्रे, मनोहर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper