Breaking News

पनवेलमध्ये 2 ऑगस्टला महारोजगार मेळावा

नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात महारोजगार मेळावा 2025 आयोजित करण्यात आला आहे.
या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे असून विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल उमेदवारही सहभागी होऊ शकतात. कंपन्यांच्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी विविध प्रकारच्या पात्रता आणि क्षमतांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हजारो रिक्त पदांवर भरती मेळाव्यात होणार आहे.
मेळाव्याद्वारे परिसरातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळवण्याची संधी निर्माण होत असून उद्योग आणि रोजगार यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने यंदाही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभाग व अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी 9930074587 किंवा 9920765765 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply