Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025 ः विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मंच

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय नवीन पनवेल येथे शाळा अंतर्गत फेरी उत्साहात झाली.
या फेरीत विद्यार्थ्यांनी माझं स्वप्न, माझा मित्र, प्लास्टिकमुक्त भारत, स्वच्छ भारत यांसारख्या विषयांवर प्रभावीपणे विचार मांडले. याद्वारे त्यांनी भाषण कलेचा सराव करताना आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि मंचावर उभे राहण्याचे बळ मिळवले.
विशेष म्हणजे या शाळा अंतर्गत फेरीतून प्रत्येक इयत्तेतून तीन विद्यार्थी पुढील आंतरशालेय फेरीसाठी निवडले जाणार आहेत. यामुळे शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकतेची रूजवणूक होत आहे.
या स्पर्धेमुळे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळत आहे. कोशिश फाउंडेशन व पनवेल महापालिका यांच्या पुढाकारातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वांनीच या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील अंतरशालेय फेरीसाठी तयारी जोमात सुरू आहे.

आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेसारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य घडते. हे व्यासपीठ मुलांना पुढील स्पर्धात्मक विश्वासाठी तयार करते.
-नीलिमा शिंदे, मुख्याध्यापक, सीकेटी विद्यालय, नवीन पनवेल

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply