खारघर ः रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय एकता, अखंडता आणि अभिमान जपण्यासाठी खारघर येथे भाजप मंडळ, तिरंगा यात्रा सन्मान समिती आणि खारघर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा पदयात्रेचे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसमवेत सहभागी होत देशभक्ती आणि देशाप्रति अभिमान व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.
या पदयात्रेला खारघर सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरुवात झाली. नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी वंदे मातरम्, भारतमाता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
पदयात्रेत भाजपचे जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, आरती नवघरे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्याक्ष किरण पाटील, अमर उपाध्याय, समीर कदम, वासुदेव पाटील, किर्ती नवघरे, संजय घरत, अजित अडसुळे, चिटणीस दत्ता ठाकूर, अनिता जाधव, महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, स्नेहल बोधाई, जुमा चक्रबर्ती, रजनी शर्मा, संतोष शर्मा, अजय माळी, राजेंद्र माजरेकर, फुलाजी ठाकूर, भरत कोंढाळकर, कांचनकुमार बिर्ला, स्मिता आचार्य, शोभा मिश्रा, दुर्गा बन्सल, सीमा खडसे, दुर्गा अंजुरे, प्रवीण बेरा, शुभ पाटील, अक्षय लोखंडे, आदित्य हातगे, शनी नवघरे, रवींद्र पाटील, माजी सैनिक चंद्रभान, शिवप्रसाद थपलियाल, परमिंदर सांगवान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय विहार मेट्रो स्टेशनजवळ पदयात्रेची सांगता झाली. या वेळी सर्वजण देशप्रेमाने भारावलेले दिसून आले.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper