Breaking News

झेप्टो कामगारांच्या न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आंदोलनाचा इशारा

रायडर कामगारांवरील अन्यायकारक वागणुकीविरोधात आक्रमक भूमिका

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबरच त्यांना न्यायिक सुविधा देण्यात याव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.
झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथील कामगारांना अचानक आयडी रद्द करणे, विमा व अपघात संरक्षेचा अभाव, अन्यायकारक दंड आकारणी तसेच कामाच्या पद्धतीत मनमानी बदल अशा समस्या भेडसावत आहेत. स्टोअरमधील या 15 कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
क्विक-कॉमर्स क्षेत्राचा कणा हे रायडरच आहेत. मुंबईत याआधी स्विगी (2023 साली), ब्लिंकिट (2024 साली) व झोमॅटो (2019 साली) यांच्या रायडर्सनी आंदोलन केलेले आहे. आता पनवेलमध्येही अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आवाज उठविण्यात आला असून झेप्टो व्यवस्थापनाने कामगारांसाठी सकारात्मक कार्यवाही न केल्यास रायडर व त्यांच्या कुटुंबांसह आंदोलन केले जाईल आणि स्टोअर बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply