Breaking News

भाजपतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे येथे ‘दिवाळी संध्या’

सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकरसह इतर गायकांच्या सुरेल गीतांची पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे परिसरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून गायन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या बहारदार गायनाचा मनमोहक आस्वाद रसिकांना मिळणार आहे.
खारघर भाजपच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर, तर रविवारी (दि. 19) सायंकाळी 7 वाजता रोडपाली बस डेपो सेक्टर 16 कळंबोली येथे होणार्‍या दिवाळी संध्या कार्यक्रमात राधा ही बावरी फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, गायक के.शिरीष, गायिका गुल सक्सेना आणि सपना हेमन या प्रसिद्ध गायकांच्या गीतांचे सादरीकरण होणार आहे, तर कामोठे भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 22) सायंकाळी 7 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय सेक्टर 6 कामोठे येथील दिवाळी संध्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरची मैफिल अनुभवायला मिळेल.
भाजपतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कलेचा संगम साधणारी ही ‘दिवाळी संध्या’ रसिकांसाठी खर्‍या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply