Breaking News

नागरीकांच्या समस्या सोडविण्याची भाजपची जबाबदारी -मंत्री आशिष शेलार

उरण : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी भाजपची राहील, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उरणमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशावेळी दिली
पनवेल आणि उरण मतदार संघात भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांवर आणि सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणार्‍या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक पक्षच पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत आहेत. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी सरपंच हेमांगी ठाकूर, उबाठा गटाचे माजी सरपंच दीपेश कोळी, माजी सरपंच नंदकुमार पाटील, माजी सरपंच भावना पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
या सर्व प्रवेश कर्त्यांचे स्वागत मंत्री आशिष शेलार, आमदार महेश बालदी, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य रवी भोईर, चंद्रकांत घरत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जसीम ग्यास, विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, उरण तालुका शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपाध्यक्ष संगीता पाटील, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका मंडळ महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, उरण तालुका भाजप सरचिटणीस सुनील पाटील, हितेश शाह, मनोहर सहतिया, माजी नगरसेविका जान्हवी पंडित, मनन पटेल, अजित भिंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मंत्री शेलार यांनी सांगितले की नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच विशेषतः प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार महेश बालदी हे नेहमीच पुढाकार घेतात. सर्वसामान्य नागरिकांची, तसेच सर्व गावांतील ग्रामपंचायतींची सर्व दु:ख आणि समस्या आजपासून भाजपची आणि आमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले.
मी संपर्कमंत्री म्हणून तुमची प्रत्येक समस्या शासनापर्यंत, तसेच अर्थमंत्र्यांपर्यंत आणि संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. आमदार महेश बालदी यांनी ज्या ज्या समस्या सांगितल्या आहेत, त्या सर्व समस्या सोडवण्याची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही मंत्री शेलार यांनी दिली.
पक्षप्रवेश कर्त्यांची नावे
उरण तालुक्यातील केगाव परिसरातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते राजेंद्र ठाकूर (नाना) यांच्या सह 118 कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये जाहीरप्रवेश केला. देवराम ठाकूर, संजय म्हात्रे, संजना म्हात्रे, निहाल म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, मीना म्हात्रे, सुधाकर पाटील, मेघना पाटील, मालती बेतकर, मनोज ठाकूर, गजानन ठाकूर, विलास ठाकूर, अलंकार ठाकूर, हीना पाठारे, संदीप पाठारे, हेमांगी ठाकूर, अनिकेत ठाकूर, प्रतीक्षा ठाकूर, दिनेश ठाकूर, मनोज पाटील, जागृती पाटील, प्रथमेश ठाकूर, धनश्री ठाकूर, हरिचंद्र पाटील, नंदकुमार पाटील, रेखा पाटील, निशा ठाकूर, विलास पाटील, मंदा पाटील, सचिन पाटील, सुगंधा ठाकूर, दिलीप पाटील, मच्छिंद्र ठाकूर, रश्मी ठाकूर, जनार्दन ठाकूर, दिगंबर ठाकूर, दिपाली ठाकूर, मोहित ठाकूर, कमलाकर पाटील, प्रीती ठाकूर, विपुल पाटील, सिद्धार्थ पाटील, कृपाली पाटील, अरनाथ पाटील, निनाथ पाटील, स्नेहल पाटील, महादेव ठाकूर, मोहन पाटील, विजय पाटील, मीना पाटील, आकाश ठाकूर, विठ्ठल ठाकूर, सीमा पाटील, भक्ती पाटील, जयश्री पाटील, सुरज पाटील, सयुकता पाटील, मनीषा पाटील, मीनाक्षी पाटील, धर्मेंद्र ठाकूर, जितेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक ठाकूर, मेघा ठाकूर, महेश ठाकूर, अर्चना ठाकूर, चंद्रकांत कांबळे, नीलम पाटील, विश्वनाथ पाटील, जिजाबाई पाटील, अनंत म्हात्रे, अनिता म्हात्रे, समीर पवार, गीता पवार, प्राची म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रितू म्हात्रे, निखील म्हात्रे, हेमंत पाटील, भावना पाटील, गणेश पाटील, विशाल, विनोद पाटील, सरिता पाटील, संध्या पाटील, किशोर पाटील, हर्शल, नरेंद्र ठाकूर, ललिता ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, शोभा ठाकूर, महेश पाटील, रोशनी पाटील, भारती पाटील, निलेश घरत, संजू चव्हाण, शैलेश पुरव, विद्या ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, सीमा ठाकूर, प्रभाकर ठाकूर, प्रवीण पाटील, असलेश पाटील, राजेंद्र पाटील, कुंदन पाटील, भालचंद्र पाटील, गणेश पाटील, रजनी पाटील, मंगेश ठाकूर, प्रतीक्षा ठाकूर, श्रीमती हिराबाई ठाकूर, माजी सरपंच केगाव (उबाठा) दिपेश कोळी, करण पाटील, साहिल पठाण आदी केगाव ग्रामस्थांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply