पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप हा विकासाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते प्रवेशकर्त्यांच्या स्वागतावेळी बोलत होते. उरण विधानसभा मतदारसंघात बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी पार पडला. या वेळी गिरीश पांडुरंग मुकादम, सुरज मुकादम आणि किरण मुकादम यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला भाजपचे पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजप नेते श्याम पवार, विभागीय अध्यक्ष विजय भोपी, अभिजीत मुकादम, मदन खारके, भावेश माळी, राकेश खारके, पवन मुकादम, प्रदीप मुकादम, मयुरेश पवार, ओमकार मुकादम, एकनाथ मुकादम यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, भाजप हा विकासाचा पक्ष आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करणार्या या पक्षात सामील होऊन अनेक कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा नक्कीच होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल व भाजपला अधिक बळकटी मिळेल.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper