Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ’संगीत मॅरेथॉन’

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष संगीत मैफिलतर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर 75 गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉनचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) पनवेलमध्ये करण्यात आले आहे.
गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य सांगीतिक कार्यक्रम पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 11.30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग होणार आहे. या कार्यक्रमात ते स्वतः 75 गाण्यांचे मनमोहक सादरीकरण करणार असून उरण, पनवेल आणि नवी मुंबईतील 75 गायकांचाही सहभाग लाभणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी सामाजिक कार्याची अखंड परंपरा जपली आणि हे कार्य त्यांच्याकडून अखंडपणे सुरूच आहे. यंदा त्यांनी आपल्या वयाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शिधा वाटप, विविध क्रीडा स्पर्धा, नाट्य महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा असे विविध समाजोपयोगी उपक्रम झाले असून पूर्ण वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. त्याच अनुषंगाने उत्कर्ष संगीत मैफिल प्रस्तुत 75 गाण्यांची संगीत मॅरेथॉन रंगणार असून रसिक प्रेक्षकांनी या अनोख्या गायन पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गायक गोपाळ पाटील आणि सहकारी गायकांनी केले आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply